सहा डिसेंबर १९५६ रोजी डॉ. आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले. आंबेडकर आकस्मित निधन हा दलित चळवळीला फार मोठा आघात होता. या घटनेमुळे अस्पृश्य विरोधी जातीअंताच्या लढ्याची एका पर्वाची समाप्ती झाली. बाबासाहेबांच्या वैचारिक अधिष्ठात अंतर्भूत असलेल्या ‘समग्र सामाजिक क्रांतीच्या’ वाटचालीचा एक टप्पा परिपूर्ण झाला. |