शेती व्यवसायाचा विकास ज्या घटकांवर अवलंबून असतो त्यापैकी एक महत्वाचा घटक म्हणून शेतमालाच्या सुव्यवस्थित खरेदी-विक्री पद्धतीचा उल्लेख करावा लागेल. शेतीत काबाडकष्ट करून पिकलेल्या शेतमालास योग्य किंमती मिळाल्यास शेतकऱ्यांना उत्पादन वाढीस प्रोत्साहन मिळून शेती व्यवसायाच्या विकासास अनुकूल वातावरण निर्माण होते. |