संत तुकाराम हे सतराव्या शतकातील मध्ययुगीन संतकवी होते. त्यांची अभंगवाणी व त्यांचे व्यक्तिमत्त्व हे मेणाहून मऊ आणि वज्रापेक्षाही कठोर होते. त्यांची कविता वैश्विक आहे. ती बंडखोर आहे व बहुसंवादी आहे. तुकारामांच्या काव्यातील त्यांची उपदेशवाणी ही वेदाहुनही श्रेष्ठ आहे. |