सामाजिक परिवर्तन, सामाजिक संरचनेत फेरबदल घडविणारी प्रक्रिया मानवांचे रितीरिवाज आचार-विचार संस्था, संघटना, जीवनपद्धती भोवतालचा परिसर, व्यक्तीव्यक्तींमधील वर्तन यांमध्ये सतत बदल हेात असतात. आदिम अवस्थेपासून ते सांप्रत काळापर्यंत मानवी समाजाच्या सर्व अवस्थांमध्ये सतत परिवर्तन झाल्याचे दिसते. |