सजीवांसाठी निसर्गातील अनेक घटक अतिशय उपयुक्त ठरलेले आहेत. त्यात हवा, पाणी, जमीन, वनस्पती, पिके, खनिजे, सौर उष्णता इ. समावेश होतो. सजिवांमध्ये या घटकांचा सर्वाधिक वापर मानवाने केला. निसर्गाने मानवाला स्मरणशक्ती, बुद्धी, निर्णयक्षमता, संशोधनक्षमता, कलागुणांच्या आविष्काराचे कौशल्य दिलेले आहे. |