प्रथम बाजीराव पेशव्याचे काळात शिंदे व होळकर घराण्याच्या सत्तेचा उदय घडून आला. राणोजी हे शिंदे तर मल्हारराव हे होळकर घराण्याच्या सत्तेचे संस्थापक होते. पहिल्या बाजीराव पेशव्याच्या काळात त्यांनी परस्पर सहकार्य व एकोप्याने कार्य केले. मात्र राणोजी शिंदेच्या मृत्यूनंतर शिंदे-होळकर घराण्यातील हे सहकार्य व एकोपा टिकला नाही. |