डॉ बाबासाहेब आंबेडकर आधुनिक भारतातील दलित ,शोषीत ,श्रमिक ,कष्टकरी ,गोर -गरीब व शुद्र , अतिशुद्र या समाज व्यवस्थेतील शेवटच्या घटकातील माणसांना नवजीवन मिळवून देणारे बुध्द, कबीर, महात्मा फुले यांची प्रेरणा घेऊन आयुष्यभर मानवमुक्तीच्या लढयासाठी मानवतवादी मूल्यांचे बीज पेरणारे गुलामगिरीच्या जोखंडातून, अंधश्रध्देच्या खाईतून ,अज्ञानाच्या अंधारातून हजारो वर्षपासून चालत आलेल्या मनुवादी वर्ण व्यवस्थेच्या घाणेरडया मानवता विरोधी प्रथेतून मुक्त करणारा हा डॉ,बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या शोषिता लोकांच्या जीवनातील अंधाऱ्या रात्रीला दूर सारून पहाटेच्या लालबुंद किरणानी उगवणारा तळपता सुर्यच जन्माला येऊन या लोंकांच्या आयुष्यतील प्रकाशाची वाट दाखविणारा दीन,दलित,उपेक्षीत समाजाला न्याय मिळवून देणारा एक कृतिशील समाजसेवकच होय. |